धानोरा : दुचाकीची झाडाला धडक बसल्याने दुचाकी चालक शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ३१ जुलै रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास धानोरा-रांगी मार्गावरील धानोरा टोला येथे घडली.
नरेंद्र पेंदाम (वय ५१, रा. धानोरा) असे मृतक शिक्षकाचे नाव आहे. ते पंचायत समिती धानोराअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करेमरका येथे शिक्षक पदावर कार्यरत होते. नरेंद्र हे (एम एच ३३ आर ८६३८) या क्रमांकाच्या आपल्या दुचाकीने
कामानिमित्त धानोरावरून जवळच असलेल्या धानोरा टोला येथे जात होते; परंतु समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या प्रकाशझोतामुळे त्यांचे डोळे दीपकले. दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली.
या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना त्वरित धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
चामोर्शी : मालवाहू वाहनाच्या धडकेत कामावरून घरी परतणाऱ्या मिस्त्रीचा मृत्यू झाला. ही घटना ४ मार्चला सायंकाळी सोनापूरजवळ घडली.
सुरेश महादेव दुधबावरे (५५, रा. सोनापूर) असे मयताचे नावच आहे. बांधकामावरील काम आटोपून ४ मार्चला दुचाकीवरून (एमएच ३३ झेड- ६८७७) ते चामोर्शीहून सोनापूरला स्वगावी जात होते. गावाजवळ
वळणावर आष्टीकडे जाणाऱ्या ट्रेलरने (सीजी ०७ बीजी- ५५९७) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात सुरेश दुधबावरे हे जागीच ठार झाले.
पोलिस निरीक्षक विश्वास पुल्लरवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
गडचिरोली : प्रियकराला दिलेले वचन निभावण्यासाठी तिने आई-वडिलांचा विरोध असतानाही प्रेमविवाह केला, मनाचा जोडीदार मिळाल्याने आयुष्यभर सुखाने संसार करण्याचे स्वप्न बघितले होते. मात्र हे स्वप्न अधुरेच राहले. प्रेमविवाहानंतर अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत अपघातात पतीचा मृत्यू झाला. काळीज हेलावून टाकणारी ही घटना तालुक्यातील पोर्ला येथे शनिवारी सायंकाळी घडली.
समीर बोंडकूजी भानारकर (२५) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यासोबतच बंटी श्यामराव म्हस्के (२३) रा. पोर्ला हा युवकसुद्धा ठार झाला. समीर हा कुरखेडा येथे सेतूकेंद्र चालवत होता. दरम्यान तेथीलच एका युवतीशी त्याचेप्रेमसंबंध जुळून आले. दोघांनीही लग्न करण्याचे ठरवले. दोघांनीही लग्नाचा प्रस्ताव आई-वडिलांकडे ठेवला. लग्नाला समीरकडील मंडळी तयार झाली, मात्र आंतरजातीय विवाह असल्याने मुलीकडच्या नातेवाइकांनी लग्नाला विरोध दर्शवला. त्यामुळे मुलीने समीर सोबत पोर्ला येथे पळून येऊन १७ मार्च रोजी एका विहारात विवाह केला. काही दिवसांनी विवाहाचा मोठा समारंभ करण्याचा मानससमीरच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. मात्र हा सर्व आनंद कदाचित नियतीला मान्य नसावा.
समीर हा त्याचा मित्र बंटीसोबत पोर्लाजवळील मोहझरी येथे शनिवारी काही कामानिमित्त दुचाकीने गेला होता. काम आटोपून परत येत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार समीर व बंटी हे दोघेही जागीच ठार झाले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.
पोर्लात शोककळा
गावातील दोन युवक एकाच दिवशी एकाच अपघातात ठार झाल्याचे लक्षात येताच पोर्ला गावात शोककळा पसरली. रविवारी शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चामोर्शी, (ता. प्र.). दुचाकीने स्वगावी जात असताना रस्त्यावर लावलेल्या बॅरिके ला धडकून दुचाकीस्वार गंभीर घटना चामोर्शी- आष्टी मार्गावरील येनापूर गावाजवळ बुधवारी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास घडली. प्रवीण आत्राम (30) रा. राजगोपालपूर ता. चामोर्शी, असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रवीण हा आपल्या दुचाकीने आष्टीवरून राजगोपालपूरकडे बुधवारी रात्रीच्या सुमारास जात होता. दरम्यान येनापूर गावाजवळ समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून मुख्य रस्त्यावर लावलेल्या आलेल्या बॅरिके ला दुचाकीची धडक बसली. यात तो गंभीर जखमी झाला. अपघात घडताच नागरिकांनी धाव घेत त्याला येणापूर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या बॅरिके मुळे अनेक अपघात घडत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील बॅरिके हटविण्यात यावे,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
येरकड-सिंदेसूर मार्गावरील घटना
गडचिरोली, ब्युरो. धानोरा तालुक्यातील सिंदेसूरवरून येरडकडे जात असलेल्या दुचाकीचालकाची ट्रकला जबर धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. देवनाथ काटेंगे (32) रा. अर्जुनी ता. धानोरा, असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार देवनाथ काटेंगे हे काही कामानिमित्य धानोरा तालुकास्थळी होते.
दरम्यान सायंकाळी काम आटोपून ते स्वगावी अर्जुनी येथे जात असताना सिंदेसूर-येरकड मार्गावरील वळणावर एकाएक ट्रक समोर आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दुचाकीवरून पडून ते थेट ट्रकखाली चिरडल्या गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच येरकड पोलिस मदत केंद्रातील जवानांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.
देसाईगंज : मुलगा दहा वर्षांचाअसताना पतीचे निधन झाले. मात्र, माउलीने एकटीने संसार सावरला. मोठ्या कष्टाने एकुलत्या एक मुलाला लहानाचे मोठे केले. राबराब राबून रापलेल्या या मायमाउलीसाठी लेकच आयुष्याच्या सायंकाळी आधाराची काठी होता, पण नियतीने ही काठी हिरावून घेतली. कुरुड येथील प्रतीक विजय घोडेस्वार (३०) हा तरुण नाटक पाहण्यासाठी म्हणून घरातून गेला व सकाळी स्वतःच्याच घराच्या दारात
रक्ताच्या थारोळ्यात आढळला. उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. या रहस्यमय घटनेने तालुका हादरून गेला आहे. प्रतीक हा मजुरीकाम करायचा. कुरुड येथे ८ फेब्रुवारी रोजी रात्री यात्रोत्सवानिमित्त गावात नाटक आले होते.
ते पाहण्यासाठी तो आई मंदाबाई (५०) यांना सांगून सायंकाळी सात वाजता घराबाहेर पडला. पहाटे तीन वाजेपर्यंत शामियानात तो नाटकाचा आनंद घेत असल्याने काही जणांनी पाहिले होते. मात्र, नंतर तो गायब झाला व सकाळी साडेसहा वाजता स्वतःच्या घरासमोर दारात रक्ताच्या थारोळ्यात गंभीररीत्या जखमी स्थितीत आढळला.
गडचिरोली : मारोती भोयर (वय ५५) रा. महादवाडी ता. गडचिरोली असे मृताचे नाव आहे. भोयर हे शेतीसह दुग्धव्यवसायही कारायचे. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी गडचिरोलीत आले. ग्राहकांना दूध वाटप केल्यानंतर गुरांसाठी पशुखाद्य खरेदी केले. त्यानंतर खाद्य आणि दुधाच्या किटल्या घेऊन ते मोटारसायकलने गावी परत जात होते. आरमोरी मार्गावरील कठाणी नदीच्या पुलावर आले असता पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यानंतर मारोती भोयर हे खाली कोसळले.
ट्रकचेचाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. घटनेनंतर चालकाने ट्रक तेथेच ठेवून पलायन केले. पोलीस त्याचा शोध घेत असून ट्रक ताब्यात घेतला आहे.
गडचिरोली : शहरात रोजंदारीचे काम करून गावाकडे परत जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. युवक दुचाकीवरून वर उसळला. त्यानंतर वाहनाच्या डाव्या बाजूच्या संरक्षक अँगलमध्ये युवकाची मान अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गडचिरोली शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या कठाणी नदीलगत बुधवारी रात्री ८:३० वाजता घडली.
शुभम राजेंद्र बेहरे (वय २८, रा. गोगाव) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. शुभम हा गडचिरोली येथील एका झेरॉक्स दुकानात रोजंदारीने काम करीत होता. दररोज सकाळी तो गोगाव येथून गडचिरोली येथे दुचाकीने यायचा. सायंकाळी पुन्हा तो गावाकडे परत जातअसे.
बुधवारी काम आटोपून तो दुचाकीने गावाकडे निघाला. दरम्यान, रात्री ८:३० वाजता आरमोरी मार्गाने मालवाहू वाहन येत होते. एका वाहनाला ओव्हरटेक करत असतानाच विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाने शुभमला उडविले. धडक देणारे मालवाहू वाहन चंद्रपूर येथे जात होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
कुटुंबाचा आधार हिरावला वाहनांच्या हेड लाइटच्या प्रकाशामुळे शुभम गांगरला व मालवाहू वाहनाची त्याच्या दुचाकीला धडक बसली. दुचाकीवरून शुभम हा उंच उसळला. त्यानंतर मालवाहू वाहनाच्या संरक्षक अँगलमध्ये शुभमची मान अडकली. गळफास घेतल्याची स्थिती यावेळी उद्भवली. शिवाय जोरदार धडक बसल्याने शुभमचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने बेहरे कुटुंबाचा एकुलता आधार हिरावला.
गट्टा परिसरातील मंदिराच्या वळणावर अपघातात ट्रॅक्टर उलटले.
एटापल्ली : स्वगावाहून दुचाकीने एटापल्ली येथे कामानिमित्त येत असलेल्या पिता व लेकीचा दुचाकी ट्रॅक्टरच्या समोरासमोर धडकेत मृत्यू झाला. ही घटना एटापल्ली-गट्टा मार्गावरील महादेव मंदिर वळणावर बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. राजू झुरू आत्राम (वय ४८) व करिश्मा झुरू आत्राम (२१, रा. देवपहाडी) असे अपघातात ठार झालेले वडील व लेकीचे नाव आहे.
तालुका मुख्यालयापासून २० कि.मी. अंतरावरील देवपहाडी येथून राजू आत्राम हे आपल्या लेकीसह मोटारसायकलने एटापल्लीला येत होते. दरम्यान, एटापल्लीवरून सिमेंट बॅग व स्टील (लोखंड) घेऊन ट्रॅक्टर एटापल्लीवरून गट्टामार्गे जात होता. दोन्ही वाहनांची महादेव मंदिराच्या वळणावर समोरासमोर धडक झाली. यात मोटार सायकलचालक राजू आत्राम हे जागीच ठार झाले; तर मुलगी करिश्मा ही गंभीर जखमी झाली. तिला गडचिरोली येथे आणत असताना चार्मोर्शीजवळ वाटेत मृत्यू झाला.
धानोरा : ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. २३ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता धानोरा- वांगी रस्त्यावरील सोडेजवळील वळणावर ही घटना घडली.
विकी कुमारशा किरंगे (२४ रा. सोडे) असे मृताचे नाव आहे. तो दुचाकीवरुन (एमएच ३३ एएफ-३०६८) धानोराहून सोडेकडे जात होते. समोरून ट्रॅक्टर येत होता. ताबा सुटल्याने भरधाव ट्रॅक्टर दुचाकीवर आदळले. यात विकी किरंगे
हा जागीच ठार झाला. मृतक ह एकुलता एक मुलगा होता. धानोर ग्रामीण रुग्णालयात डॉ. देवेंद्र सावसागडे यांनी तपासून मृत घोषित केले. अधिक तपास धानोरा पोलिस करीत आहेत.
गडचिरोली -शहरातील चंद्रपर महामार्गावरील शासकीय विश्रामगृहानजीक कन्हाळगाव येथे देवाच्या दर्शनासाठी जात असलेला टेम्पो दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात रस्ता दुभाजकावर धडकुन टेम्पो पलटल्याची घटना आज २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
एमएच ३३ टी २२४३ या क्रमांकाच्या टेम्पोने क्रमांकाने १० भाविक कन्हाळगाव येथे दर्शनासाठी देवाच्या जात असतांना एका पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी मध्ये आल्याने दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात टेम्पो दुभाजकास धडकला.
या अपघातामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नसली तरी टेम्पोमध्ये असलेले प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या संदर्भात ठाणेदार फेगडे यांना विचारणा केली असता याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल केला नसुन प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
धानोरा : तालुक्यातील येरकड-मालेवाडा मार्गावरील काळी पहाडीजवळ झाडाला धडकून जीप उलटली. शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास निदर्शनास आले. मात्र, दिवसभर या वाहनाजवळ कुणीही न फिरकल्याने संबंधित घटनेचे गूढ कायम आहे.
जीप (एम एच ३५ बीएच ०९४२) झाडाला धडक देऊन उलटल्याचा अंदाज आहे. दरम्यान, सकाळी दोन युवक वाहनाजवळ आढळून आले. मात्र, नंतर ते गायब झाले. त्यानंतर दुपारी व सायंकाळी कोणीच या वाहनाकडे फिरकले नाही. सायंकाळपर्यंत सदर वाहन घटनास्थळावरच होते. येरकड पोलिस मदत केंद्रात संपर्क केला असता माहिती मिळू शकली नाही.
मालवाहू रिक्षा उलटून चार जखमी
गडचिरोलीतील सर्किट हाऊसजवळ मालवाहू राहू रिक्षा रिक्षा उलटूनही र चार जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उशिरापर्यंत गडचिरोली ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती. त्यामुळे अधिक तपशील मिळू शकला नाही.